Advertisement

आरटीई प्रवेशाची आज पहिली सोडत


आरटीई प्रवेशाची आज पहिली सोडत
SHARES

समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यासाठी मंगळवारी यंदाची पहिली ऑनलाइन सोडत काढण्यात आली आहे. ही सोडत दादर येथील हिंदू कॉलनीतील शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या चौथ्यामाळ्यावरील सभागृहात दुपारी ३ वाजता जाहीर होणार आहे.


३४७ शाळांत ८ हजार ३७४ जागा

मुंबईतील ३४७ शाळांत ८ हजार ३७४ जागा असून या जागांसाठी तब्बल १० हजार ६६२८ बालकांच्या प्रवेशासाठी पालकांनी अर्ज दाखल केले आहेत. पहिल्या सोडतीत प्रवेश मिळालेल्यांना अर्जात नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठवण्यात येतील. त्यानंतर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा