Advertisement

MPSC आणि BEd परीक्षा एकाच दिवशी, विद्यार्थ्यांना सरकारनं दिला 'हा' पर्याय

एमपीएससी आणि बीएडची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

MPSC आणि BEd परीक्षा एकाच दिवशी, विद्यार्थ्यांना सरकारनं दिला 'हा' पर्याय
SHARES

महाराष्ट्रात यंदा एमपीएससी (MPSC) आणि बीएड परीक्षेसाठी सीईटी (MAH B.Ed. CET 2022) अशा दोन्ही परीक्षा 21 ऑगस्ट दिवशी आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एमपीएससी आणि बीएडची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

परीक्षांच्या तारखा बदलाव्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. एकाच दिवशी परीक्षा आल्यामुळे परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आली होती. यासंबंधी विद्यार्थ्यांनी राज्य सीईटी सेलच्या (State CET Cell) सचिवांना पत्र लिहिले होते.

विद्यार्थ्यांची गैरसोय होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. आता यासंबंधी सरकारने दोन्ही परीक्षा देणाऱ्यांना तारखेबाबत पर्याय देण्यात येणार असल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दोन्ही परीक्षा विद्यार्थ्यांना देता येणार आहेत.

दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तारखांबाबत पर्याय देणार असल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. परीक्षार्थींनी त्वरीत सीईटी सेलशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

रविवार, सोमवार आणि मंगळवार अशा तीन दिवस परीक्षा असल्याने संबंधित विद्यार्थ्यांनी संवाद साधल्यास त्यांना सोमवार आणि मंगळवार अशा दोन दिवसांत त्यांना संधी दिली जाईल, असा निर्णय झाल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

बीएड सीईटी परीक्षा 21 ऑगस्टपासून 3 दिवस चालणार आहे. एमपीएससी स्टेट सर्विसेस प्रीलिम्स परीक्षा 21 ऑगस्ट दिवशी आहे. या परीक्षेची अ‍ॅडमीट कार्ड्स वेबसाईट वर जारी करण्यात आली आहेत. त्यासाठी mpsconline.gov.in ला भेट द्यावी लागेल. प्रीलिम्स नंतर मुख्य परीक्षा आणि मुलाखत फेरी असे 3 टप्पे पार केल्यानंतर विद्यार्थ्यांना अंतिम निकाल पाहता येतो.



हेही वाचा

मुंबई IIT च्या एम टेक, पीएचडी अभ्यासक्रमाच्या फीमध्ये 35 ते 40 टक्के वाढ

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा