बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी १ जूनपासून पहिल्या वर्षाच्या (एफवाय) प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली अाहे. या प्रवेश प्रक्रियेत अाता महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना १२ जूनला कॉलेजमध्ये गुणपत्रिका मिळणार असल्याने प्रवेश प्रक्रियेच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. एफवायसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेच्या अर्जविक्रीची शेवटची तारीख ९ जून होती. ही मुदत अाता १८ जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.
१ जूनपासून सुरु करण्यात आलेल्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीसाठी आतापर्यंत १ लाख १४ हजार ५९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली अाहे. तर विविध अभ्यासक्रमांसाठी २ लाख ९७ हजार ७५९ अर्ज अाले आहेत.
प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रियेच्या सुधारीत वेळापत्रकाची विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयातील प्राचार्यांनी नोंद घ्यावी.
- डाॅ. दिनेश कांबळे, मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव
हेही वाचा -