Advertisement

मुंबई विद्यापीठाचे 'हे' निकाल जाहीर होणार कधी?


मुंबई विद्यापीठाचे 'हे' निकाल जाहीर होणार कधी?
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या निकालांचा गोंधळ संपणार कधी याचीच वाट विद्यार्थी बघत आहेत. मुंबई विद्यापीठाने प्रथम सत्र 2017च्या परीक्षेसाठी 56 हजारांपैकी 4550 अर्जांच्या पुनर्मूल्यांकनाचे निकाल शनिवारी जाहीर केले.

विद्यार्थ्यांना त्यांचे हे निकाल विद्यापीठाच्या http://www.mumresults.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामध्ये कला शाखेसाठी २३८, वाणिज्य १४, विधी १८१, विज्ञान १११ आणि तंत्रज्ञान ४००६ अशा एकूण ४,५५० अर्जांचे निकाल विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले आहेत.

प्रथम सत्र २०१७च्या परीक्षेसाठी विद्यापीठाकडे आतापर्यंत ५६,३५४ अर्ज पुनर्मूल्यांकनासाठी आले आहेत. त्यापैकी विद्यापीठाने ४५५० अर्जांचे निकाल शनिवारी जाहीर केले आहेत. उर्वरीत पुनर्मूल्यांकनाचे निकाल हे लवकरात लवकर लावण्यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न केले जात आहेत.

डॉ. अर्जुन घाटुळे, प्रभारी परीक्षा संचालक

विद्यापीठाला पुनर्मूल्यांकनाचे 50 हजाराहून अधिक आणि 16 हजार गहाळ उत्तरपत्रिकांचे निकाल अाता जाहीर करायचे आहेत.



हेही वाचा -

राखीव निकालांसाठी विद्यापीठाची नवीन वेबसाईट


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा