मंगळवारी एफवाय प्रवेशाची पहिली कट ऑफ लिस्ट जाहीर करण्यात अाली. मुंबईतील अनेक नामांकित कॉलेजांमध्ये आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्सच्या सर्व शाखांचा कट ऑफ यंदा पाच ते नऊ टक्क्यांनी वाढली अाहे. तर मोठ्या कॉलेजांचा कट ऑफ नव्वदीपार गेला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाची (एफवाय) पहिली कट ऑफ लिस्ट मंगळवारी जाहीर करण्यात आली. बीए, बीएससी, बीकॉम, बीएमएम, बीएमएस, बीएससी आयटी, बीएससी (कम्प्युटर सायन्स), बीकॉम (बँकिंग अॅण्ड इन्शुरन्स), बीकॉम (अकाऊंट अॅण्ड फायनान्स) अशा सर्व पारंपरिक व सेल्फ फायनान्सच्या अभ्यासक्रमासाठी ही पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीवर नजर टाकली असता, सेल्फ फायनान्सचा अभ्यासक्रम, तसेच कॉमर्स शाखेला मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे.
रूईया महाविद्यालयाचा कट अाॅफ - बीएससी ८५.०८ टक्के, बीए ९१.०८ टक्के, बीएमएम (आर्टस) ९१.०८ टक्के, (सायन्स) ९० टक्के, (कॉमर्स) ९०.७५ टक्के
माटुंग्याच्या पोदार कॉलेजच्या कट ऑफ - बीकॉम ९३.६९ टक्के, बीएमएस (कॉमर्स) ९४ टक्के, (आर्ट्स) ८६.३१ टक्के, (सायन्स) ८९.८० टक्के
विद्याविहारच्या एस.के सोमय्या कॉलेजचा कट ऑफ - बी.ए ७० टक्के, बीकॉम ७८ टक्के
यंदा पहिला कट ऑफ वाढल्याने ६० ते ७५ टक्क्यांच्या घरातील विद्यार्थ्यांना प्रवेशाची चिंता भेडसावू लागली आहे. दुसऱ्या लिस्टमध्ये तरी आपले नाव येईल की नाही, याची धास्ती लागून राहिली आहे. दरम्यान, मंगळवारी जाहीर झालेल्या यादीतील विद्यार्थ्यांना बुधवारी २० जूनला कागद पडताळणी करायची असून २१ जून रोजी फी भरून प्रवेश निश्चित करायचा आहे.
हेही वाचा -
विद्यापीठ, महाविद्यालयात योग दिवस साजरा करा - राज्यपाल
मॅनेजमेंट कॉलेजांमध्ये प्रवेश राज्यस्तरीय कोट्यानुसार