Advertisement

शिक्षकांची कोरोना चाचणी होणार मोफत

शिक्षकांची मोठी जबाबदारी असून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी शिक्षकांची कोरोना चाचणी मोफत करण्यात येणार आहे.

शिक्षकांची कोरोना चाचणी होणार मोफत
SHARES

अवघ्या ८ महिन्यांच्या कालावधीनंतर विद्यार्थी (students) पुन्हा शाळेची पायरी चढणार आहेत. कोरोनामुळं मागील ८ महिन्यांपासून बंद असलेली शाळा व कॉलेज सोमवार २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. सुरूवातीला केवळ राज्यातील ९वी ते १२वीचे वर्ग सोमवारपासून सुरू होणार आहेत. मात्र, यावेळी शिक्षकांची (teachers) मोठी जबाबदारी असून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी शिक्षकांची कोरोना चाचणी (corona test) मोफत करण्यात येणार आहे.

शाळा र्निजतुक करणं, तापमान मापक उपलब्ध करून देणं अशा जबाबदाऱ्याही शिक्षण विभागानं स्थानिक प्रशासनावर सोपवल्या आहेत. राज्यातील शाळांमध्ये (school) ९वी ते १२वीचे वर्ग सुरू होत आहेत. त्यासाठी शाळा र्निजंतूक करणं, आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देणं अशी सर्व व्यवस्था स्थानिक प्रशासनानं करावी, अशा सूचना शिक्षण विभागानं दिल्या आहेत.

शिक्षकांना कोरोना चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं असून, कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव झाला नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतरच शिक्षकांना शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. शिक्षकांची कोरोना चाचणी शासकीय केंद्रात मोफत करण्यात यावी, असं शिक्षण विभागानं स्थानिक प्रशासनाला स्पष्ट केलं असून, ही चाचणी २२ नोव्हेंबपर्यंत करायची आहे.

मुंबई पालिका क्षेत्रात मनपाच्या १ हजार १२२ शाळा आणि खासगी, विनाअनुदानित मिळून १५०० पेक्षा अधिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयं आहेत. या शाळांमध्ये मिळून ६० हजारपेक्षा अधिक शिक्षक, कर्मचारी आहेत. रोजच्या संशयित रुग्णांबरोबरच एवढ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची चाचणी अवघ्या ५ दिवसांत होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

एवढ्या शाळा र्निजतूक करणं आणि बाकी सर्व व्यवस्था करण्यासाठीही २२ तारखेपर्यंतचा कालावधी पुरेसा नाही, असा आक्षेप शिक्षक संघटनांनी घेतला आहे. शिक्षकांच्या चाचणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. त्याचप्रमाणं सर्व तयारीचा आढावा घेतल्यानंतरच शाळा सुरू करण्याची तारीख जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनं केली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा