Advertisement

परदेशात उच्च शिक्षणासाठी सरकारची शिष्यवृत्ती

नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने २० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील खुल्या तसंच इतर मागासवर्गीय, विजा-भज, विमाप्र या प्रवर्गातील एकूण २० विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

परदेशात उच्च शिक्षणासाठी सरकारची शिष्यवृत्ती
SHARES

परदेशात शिक्षण घ्यायचं झाल्यास सर्वसामान्य घरातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांपुढे प्रश्न निर्माण होतो तो शिक्षण खर्चाचा. पण आता चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांपुढील मोठी अडचण दूर होणार आहे.


कुणाला मिळणार शिष्यवृत्ती?

नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने २० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील खुल्या तसंच इतर मागासवर्गीय, विजा-भज, विमाप्र या प्रवर्गातील एकूण २० विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी याकरीता शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


नामी संधी

जगातील आघाडीच्या २०० विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याची संधी विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मिळणार आहे. एवढंच नव्हे, तर पहिल्या २५ विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष सवलतही देण्यात येईल. यांत आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हवामान बदल, ऊर्जा बचत, अॅनॅलिटिक्स आणि नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे.



हेही वाचा-

पेपर तपासणीच्या कामात एकसमानता येणार

नीट परीक्षा वर्षातून एकदाच; केंद्र सरकारचा यू-टर्न



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा