महाराष्ट्रातील अनुदानित शाळांमधील शिक्षण भरती आता केंद्रीय अभियोग्यता चाचणीद्वारे घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता शाळांमधील भरती प्रकरणात होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल. केवळ गुणवतेच्या आधारावर भरती करण्यात येईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
खासगी आणि अनुदानित शाळांमध्ये वाढत जाणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालावा, अशी मागणी विविध संघटनांनी महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली होती. यापुढे शिक्षक भरती करताना परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या शिक्षकांचीच नेमणूक करण्यात येणार आहे. सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. खासगी विनाअनुदानित शाळांना हा निर्णय लागू होणार नाही.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षक मिळतील. याचा फायदा विद्यार्थ्यांनाच होईल. शिक्षक भरतीतील भ्रष्टाचार बंद होईल, असा मला विश्वास वाटतो.
विनोद तावडे, शिक्षणमंत्री