Advertisement

विद्यार्थ्यांना रसायनशास्त्रामध्ये द्या सरसकट ७ गुण- राष्ट्रवादीची मागणी


विद्यार्थ्यांना रसायनशास्त्रामध्ये द्या सरसकट ७ गुण- राष्ट्रवादीची मागणी
SHARES

यंदा इयत्ता १२ वीच्या परीक्षेमधील विज्ञान शाखेच्या रसायनशास्त्र या पेपरमध्ये ४ प्रश्न चुकीचे आले होते. त्याचे विद्यार्थ्यांना सरसकट ७ गुण मिळावेत, अशी मागणी करत आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाळवा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिलं.


शिक्षणमंत्र्यांचं आश्वासन

विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत या मागणीवर चर्चा करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांनी हे चुकीचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असेल त्यांनाच सरसकट ७ गुण दिले जातील, हा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. हा निर्णय सर्वस्वी चुकीचा असल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

मंडळाच्या चुकीचा भुर्दंड विद्यार्थ्यांना कशाकरीता? असा प्रश्न विचारून सरसकट सगळ्याच विद्यार्थ्यांना ७ गुण देत त्यांचं होणारं नुकसान थांबवावं आणि येथून पुढच्या कालावधीत होणाऱ्या परीक्षांमध्ये अशा चुका टाळाव्यात, अशी मागणी केली.

या प्रश्नावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच बोर्डाकडून या संदर्भातील अहवाल मागवून घेत विद्यार्थ्यांना सरसकट ७ गुण देण्याचा प्रयत्न केला जाईल, असं आश्वासन दिलं.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा