राज्य सीईटी सेल आणि तंत्रशिक्षण संचालनालयाने आर्किटेक्चर (वास्तुविशारद) कॉलेजांमधील प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. या शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना www.mahacet.org/arch2018 या वेबसाईटवर २० जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहे.
आर्किटेक्चर प्रवेशासाठी विद्यार्थांना ऑनलाईन अर्ज करणं बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कही ऑनलाइन भरता येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थांना विज्ञान शाखेतून गणित विषयासह बारावी पास होणं गरजेचं आहे. प्रवेशासाठी खुल्या गटातील विद्यार्थ्यांना ५० टक्के तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना किमान ४५ टक्के गुण असणे आवश्यक आहे.
हेही वाचा -
'आयटीआय' प्रवेशाचे वेळापत्रक का झालं रद्द? वाचा...
विद्यापीठाची परीक्षा पद्धती बदलणार!