महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10 वीची पुरवणी परीक्षा जुलै आणि ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे. 10 वी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा उत्तीर्ण होण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.
मंडळाने 14 जुलैला पूर्वनिपरिक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 14 जुलै पासून लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहेत. मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर हे वेळापत्रक विद्यार्थ्यांना बघता येईल.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, खासगी क्लासने प्रकाशित केलेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
असे आहे वेळापत्रक -
18 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत लेखी परीक्षा
10 जुलै ते 17 जुलै या कालावधीत तोंडी परीक्षा, कार्यानुभवाची लेखी व तोंडी परीक्षा
17 जुलैला शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र, गृहशस्त्रची प्रात्यक्षिक परीक्षा
हेही वाचा-
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा