कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेतील शिल्लक धान्य विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे. याबाबत राज्याचे उप सचिव राजेंद्र पवार यांनी शिक्षण संचालकांना आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी शाळांमध्ये पोषण आहार योजना राबवण्यात येते. मात्र आता करोना साथीमुळे शाळांना १४ एप्रिलपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी पोषक आहारपासून वंचित राहू नयेत, म्हणून शाळेतील शिल्लक धान्य विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे.
राज्य शिक्षण विभागाच्या वतीनं राज्यातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी पोषण आहार योजना राबविण्यात येते. मात्र आता करोनामुळे राज्यातील शाळा १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. सर्व उद्योग पुढील आदेश येईपर्यंत बंद असणार असल्यामुळं नागरिकांनी साठवून ठेवलेलं धान्य संपण्यास सुरुवात झाली आहे.
सुट्टीच्या काळातदेखील विद्यार्थ्यांचं आरोग्य चांगलं रहावं, यासाठी शाळांनी आपल्याकडे शिल्लक असणारे धान्य विद्यार्थ्यांना देण्याचे आदेश राज्याचे उप सचिव राजेंद्र पवार यांनी दिले आहेत. मात्र या आदेशात काही बाबींमध्ये स्पष्टता नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यामुळे हे काम करण्यासाठी सरकारने जोड आदेश काढून अधिक स्पष्टता आणावी, तसेच हे वाटप नेमके कसे करावे, याबाबत सूचना कराव्यात, अशी मागणीही शिक्षकांकडून होत आहे.
हेही वाचा -
Coronavirus : धारावीतील कोरोना रुग्णाचा मत्यू, दिवसभरातील तिसरा बळी
Coronavirus : मुंबईत १४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण, २४ तासात सापडले ३० रुग्ण