Advertisement

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला युवासेनेचं समर्थन

विद्यार्थ्यांच्या या मागणीनंतर युवासेनेनं महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला युवासेनेचं समर्थन
SHARES

कोरोना व्हायरसमुळं यंदाच्या शैक्षणिक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. परंत, या परीक्षांबाबत राज्य सरकारनं शुक्रवारी महत्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार, प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच, राज्यमंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार असल्याचा निर्णय घेतला. तसंच, विद्यार्थ्यांनाही उपस्थित राहावं लागणार आहे. या परीक्षेचं आयोजन जुलै महिन्यात करण्यात येणार आहे. परंतु, या निर्णयानंतर राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या या मागणीनंतर युवासेनेनं महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष यांनी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी पत्र लिहीलं आहे. 



प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेला निर्णय दिलासादायक आहे. या निर्णयामुळं बर्‍याच विद्यार्थ्यांनी ट्विटरवर जाऊन त्यांचा आनंद शेअर केला. मात्र, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये निराशा पसरली आहे. या निर्णयामुळं परीक्षेसाठी प्रवास करणं, वसतिगृहांकडं परत जाणं आणि लॉक डाऊन दरम्यान बरेच काम करणं याबाबत चिंता होती.



हेही वाचा -

कॅन्टीन बंद असल्यानं बेस्ट कामगारांचे हाल

जुलैपासून चित्रकरणाला होणार सुरूवात?



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा