अभिनेते अतुल परचूरे यांचे निधन झाले आहे. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीला धक्का बसला आहे. अनेक नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मागील अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते. इतकच नव्हे तर त्यांनी कर्करोगावर मात करत रंगभूमीवरचा अंक सुरुच ठेवला होता. त्यांच्या या नव्या अंकाचं अनेकांनी भरभरुन कौतुक केलं होतं. इतकच नव्हे तर त्यांनी नुकतच सुर्याची पिल्ले या नाटकाचीही घोषणा केली होती. त्यामुळे अतुल परचुरे हे रंगभूमीवरुन पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासही सज्ज झाले होते.
अतुल परचुरे यांनी जिगरबाज वृत्तीनं कॅन्सरवर मात केली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा काम करण्यास सुरुवात केली होती.
मराठी रंगभूमीवर पुन्हा दाखल झालेल्या सूर्याची पिल्ले या नाटकातही त्यांची भूमिका होती. पण, कॅन्सरनंतरची त्यांची इनिंग दुर्दैवानं फार काळ चालली नाही. त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. अष्टपैलू अभिनेता, चांगला मित्र गमावल्याची भावना त्यांच्या सहकलाकारांनी व्यक्त केली आहे.
व्यक्ती आणि वल्ली या नाटकात पु. ल. देशपांडे यांची भूमिका अतुलने साकारली आणि पु.ल. देशपांडे यांनी ती पाहिली आणि अतुलला शाबासकी दिली होती.