Advertisement

मुंबई महापालिकेच्या वृक्ष तपासणी मोहिमेला सुरूवात

अहवालांनुसार, अधिकारी रस्त्याचे काम सुरू असलेल्या भागांवर लक्ष केंद्रित करतील. तसेच पहिल्या टप्प्यात 500 ते 1000 झाडांचे सर्वेक्षण होणे अपेक्षित आहे.

मुंबई महापालिकेच्या वृक्ष तपासणी मोहिमेला सुरूवात
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (brihanmumbai municipal corporation) "डेड डेंजरस ट्री" नावाची आपत्कालीन वृक्ष तपासणी मोहीम सुरू केली आहे. सर्वेक्षणात कमकुवत झाडांची ओळख पटवली जाईल. ही तपासणी सोमवारी 3 मार्च रोजी सुरू झाली आहे. या मोहिमेद्वारे आठ दिवसांत 1,000 हून अधिक झाडांची तपासणी केली जाईल.

अहवालांनुसार, अधिकारी रस्त्याचे काम सुरू असलेल्या भागांवर लक्ष केंद्रित करतील. तसेच पहिल्या टप्प्यात 500 ते 1000 झाडांचे सर्वेक्षण होणे अपेक्षित आहे.

उच्च तापमान आणि काँक्रीटीकरणामुळे शहरात झाडे कमकुवत होऊन त्यांच्या संख्येत घट होत आहे. 25 ते 26 फेब्रुवारी दरम्यान मुंबईत 36 ते 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमान वाढीमुळे झाडांच्या मुळांचा ओलावा कमी होतो आणि त्यामुळे ते आकुंचन पावतात. ज्यामुळे झाडे पडण्याचा धोका वाढतो.

झाडांना योग्य वाढीसाठी त्यांच्या छताएवढी जागा आवश्यक असते. तथापि, कंत्राटदाराकडून अनेकदा झाडांच्या मुळांसाठी एक मीटरचे अंतर राखले जात नाही.

बांधकाम पद्धतींमुळे झाडांना (tree plantation) नुकसान पोहोचत असल्याबद्दल पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. गॉडफ्रे पिमेंटा यांनी राज्य पर्यावरण विभागाला या समस्येबद्दल पत्र लिहिले आहे. त्यांनी अंधेरी पूर्वेतील सहार गावात 50 झाडांजवळील काँक्रीटीकरणाबद्दल सांगितले आहे. त्यांच्या पत्रात असे म्हटले गेले आहे की, झाडांच्या मुळांभोवती असलेले काँक्रीट पाणी आणि हवेच्या प्रवाहात अडथळा आणते.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) 2015 मध्ये महापालिकेला (bmc) झाडांच्या एक मीटरच्या आत असणारे काँक्रीट काढून टाकण्याचे आदेश दिले होते. वृक्ष प्राधिकरणाने वॉर्ड अधिकाऱ्यांनाही पत्र लिहून मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. पालन न करणाऱ्या कंत्राटदारांना कारवाईला सामोरे जावे लागेल.

17 एप्रिल 2024 रोजी पर्यावरण कार्यकर्ते झोरू भठेना यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIAL) दाखल केली. त्यांनी महामार्गालगतच्या झाडांसाठी योग्य जागा देण्याची मागणी केली.

त्यांनी सांगितले की महापालिकेने त्यांचे रस्ते धोरण बनवताना झाडांचा विचार केला नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेली झाडे कायद्याने आवश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

मुंबईत (mumbai) सुमारे 29.75 लाख झाडे आहेत. शेवटची झाडांची गणना 2011 मध्ये करण्यात आली होती. डेटा अपडेट करण्यासाठी या वर्षी नवीन वृक्ष सर्वेक्षण केले जाईल.



हेही वाचा

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये ‘एचएसआरपी’ बसविणे अनिवार्य

कोस्टल रोड पूर्णत: सुरू होणार, 24000 वाहने धावण्याची शक्यता

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा