Advertisement

पुढील 24 तासात मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा


पुढील 24 तासात मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा
SHARES

हवामान विभागाच्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी मान्सूनची वेगानं प्रगती होताना दिसत असून देशाप्रमाणं राज्यातही तो अंदाजे वर्तवण्यात आलेल्या वेळेआधीच दाखल झाला. (Monsoon Updates)

सर्वसाधारणपणे मान्सून मुंबईत 11 जूनला दाखल होतो. यंदा मात्र मान्सून मुंबईत दोन दिवस आधिच दाखल झालाय. भारतीय हवामान विभागानं याबाबतची अधिकृत घोषणा केली.

पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

यादरम्यान, शहरासह उपनगरीय क्षेत्रातील वातावरण पूर्णत: ढगाळ राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. पावसाची एकंदर वाटचाल पाहता हवामान खात्यानं ठाणे, रायगड, रत्नागिरीसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट, मुंबईसाठी यलो अलर्ट आणि कोकणात सिंधुदुर्गसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Mumbai Rain) 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा