भांडूप - भांडुप, पूर्व द्रुतगती महामार्गालगत जखमी अवस्थेत सापडलेल्या पाळीव स्टार कासवावर ठाण्यातील एसपीसीए प्राणी रुग्णालयात उपचार सुरू असून, हे कासव उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलय. रौनक शहा याला शनिवारी रात्री पूर्व द्रुतगती महामार्गाच्या सर्विस रोडवर हे स्टार कासव दिसले होते. कासवाचे पुढचे दोन्ही पाय उंदीर आणि घुशींनी कुरतडल्याने या कासावाला धड चालताही येत नव्हते. त्यामुळे शहा याने कासवाला सोबत घेऊन प्राणिमित्र विवेक सेठीया आणि हिरेन चुडासमा यांच्या हवाली केले होते. दरम्यान अशा जातीचे कासव क्रॅफर्ड मार्केट अवैधरित्या विक्री करण्यात येतात.
मात्र वन्यजीव कायदा 1972 अन्वये असे प्राणी पाळणे कायद्याने गुन्हा असल्याचं जेव्हा नागरिकांनी कळत तेव्हा अशी कासवं पाळणारे त्यांना रस्त्यांवर सोडून देतात. आणि हेच त्यां कासवांच्या जीवावर बेतते, असे प्राणीमित्र संघटनेचे अध्यक्ष पवन शर्मा यांनी सांगितले.