मुंबई (mumbai) आणि परिसरात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत किमान 26 अंश सेल्सिअस आणि कमाल 31अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सकाळी शहरात हलका ते मध्यम पाऊस झाला होता.
गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईत सतत मुसळधार पाऊस (mumbai rain) पडत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD)ने अंदाज वर्तवला आहे की, मुंबई शहर आणि उपनगरी भागात ढगाळ वातावरण (weather) राहील आणि संध्याकाळ पर्यंत मुसळधार पाऊस (heavy rain) पडेल.
आज हवामान कसे असेल?
मुंबईतील तापमान किमान 26°C आणि कमाल 31°C तसेच सरासरी 30°C च्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे. नैऋत्येकडून 11.1 किमी ताशी वेगाने वारे वाहतील. तसेच सूर्याेदय 6:16 वाजता होईल आणि 7:14 वाजता सुर्यास्त होईल.
पुढील आठवड्यात शनिवार ते बुधवारपर्यंत मुंबईचे किमान तापमान 25 अंश सेल्सिअस ते 26 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
येत्या आठवडाभर शहरात अशीच परिस्थिती राहील. तसेच तापमानात किंचित घट होईल. किमान तापमान 25°C आणि 26°C दरम्यान राहील, तर कमाल तापमान 30°C आणि 31°C दरम्यान असेल.
पुढील आठवडाभर ढगाळ वातावरणासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शनिवार ते मंगळवार आकाश ढगाळ राहील आणि मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात (MMR) पावसाची शक्यता असेल.
हेही वाचा