Advertisement

मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज

सध्या लोकल गाड्यांवर पावसाचा फारसा परिणाम झालेला नाही.

मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज
SHARES

बुधवारी सकाळपासून मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, मुंबई शहरात 101 मिमी पाऊस पडला, तर सांताक्रूझ वेधशाळेने नोंदवलेला हा आकडा 50.2 मिमी होता, बीएमसीच्या म्हणण्यानुसार, 10 तासांच्या कालावधीत मुंबईत 47.29 मिमी पाऊस पडला. महानगराच्या पूर्व भागात 30.56 मिमी पाऊस पडला आणि पश्चिम भागात 38.18 मिमी पाऊस झाला.

मुंबईत झाडे किंवा फांद्या पडण्याच्या 10 घटना, घरे आणि भिंती पडण्याच्या चार घटना आणि शॉर्ट सर्किटशी संबंधित पाच घटनांची नोंद झाली आहे. तरी या अनुचित घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही. रेल्वे आणि रस्ते वाहतूक सेवा सामान्य आहे. मात्र उपनगरीय गाड्या 10-15 मिनिटे उशिराने धावत असल्याचे अनेक प्रवाशांनी सांगितले.

आर्थिक राजधानीत सकाळपासून झालेल्या पावसामुळे गांधी मार्केट, दादर, हिंदमाता, परळ, अंधेरी सबवे आणि सायन यांसारख्या सखल भागात पाणी साचले. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाल्याची तक्रार नागरिकांनी केली.



हेही वाचा

ठाण्यातील 'या' 6 मोठ्या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होणार

येस बँकेच्या उप व्यवस्थापकाला 5 लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी अटक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा