सध्या उन्हाची काहिली अनुभवत असलेल्या मुंबईकरांसाठी काही काळ दिलासा मिळणार आहे. मुंबईमध्ये या विकेंडला पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.
अहवालानुसार 11-14 मे या कालावधीमध्ये मुंबईमध्ये पाऊस होऊ शकतो. मुंबई आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर परिस्थिती मध्यम पावसासाठी अधिक अनुकूल दिसत आहे.
ताज्या अंदाजानुसार, मुंबई उपनगरांच्या तुलनेत दक्षिण मुंबईमध्ये अधिक पाऊस होईल, तर एमएमआरच्या (MMR) च्या दक्षिण आणि पूर्व भागात उर्वरित एमएमआरपेक्षा जास्त पाऊस पडेल. मुंबई किनारपट्टीवरही पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे पुणे, घाट आणि दक्षिण महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा
मुंबईसह ठाणे, रायगडला 'या' तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा