गेल्या 24 तासांत ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये या मोसमातील सर्वाधिक 408 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. उल्हासनगर शहरात 313 मिलिमीटर आणि अंबरनाथ शहरात 290 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती खासगी हवामानतज्ज्ञ अभिजित मोडक यांनी दिली.
यापूर्वी 26 जुलै 2019 रोजी 540 मिमी पाऊस पडला होता. त्याचवेळी बदलापूरजवळ महालक्ष्मी एक्सप्रेस पुरात अडकली. बुधवारच्या पावसामुळे बदलापूरमधील सखल भागात आणि उल्हास नदीला पूर आला.
ठाणे जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या संततधार पावसामुळे बुधवारी जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यातील नदीकाठ आणि सखल भाग जलमय झाले आहेत.
रायगड जिल्ह्यात एकाच वेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे बदलापूर शहरातील नदीकाठच्या भागात, कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी पाणी शिरले. रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी सरासरी 250 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातही या हंगामात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.
बदलापूरप्रमाणेच जिल्ह्यातील इतर शहरांमध्येही सरासरी 200 मिमी पावसाची नोंद झाली आहे. उल्हासनगर शहरात 313 मिमी, अंबरनाथ शहरात 290 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातील सखल भागात पाणी साचले.
यापूर्वी 26 जुलै 2019 रोजी बदलापूरमध्ये तब्बल 540 मिमी पावसाची नोंद झाली होती. या पावसात उल्हास नदीला आलेल्या पुरात महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली होती. 2005 च्या पुरात अंबरनाथ तालुक्यात एका दिवसात 1000 मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली होती.
20 जुलै ते सकाळी 8.00 वा
बदलापूर 408
उल्हासनगर 313
पालव 274
भिवंडी 235
बेलापूर 224
ठाणे 216
मीरा भाईंदर 194
मुंब्रा 191
आंबिवली 187
डोंबिवली 182
नेरुळ 181
मुरबाड 180
टिटवाळा 163
दिवा 150
रबाळे 130
कोपरखैरणे 124
हेही वाचा