हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार (IMD), 17 आणि 18 ऑक्टोबरला म्हणजे आज आणि उद्या मुंबई शहर, उपनगर आणि आजूबाजूच्या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (Maharashtra Rainfall) पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने सोमवरी आणि मंगळवारी मुंबईला यलो अलर्ट (Mumbai Yellow Alert) दिला आहे. तसेच ठाणे (Thane), रायगड(Raigad) पालघरसह(Palghar) राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
यंदा परतीच्या पावसानं (Rain) राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. गेल्या दहा वर्षातील ऑक्टोबर महिन्यातील रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातून मान्सूनने रजा घेतली आहे.
शनिवारी सकाळी मुंबई 216 मिमि पावसाची नोंद झाली. या अगोदर 1998 साली मुंबईत 376 मिमि म्हणजे आतापर्यंतच्या सर्वाधित पावसची नोंद झाली होती. सांताक्रुझ वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, 8 ऑक्टोबरला 113 मिमि पावसाती नोंद झाली आहे. गेल्या दहा वर्षातील ऑक्टोबर महिन्यातील सर्वाधिक पाऊस आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून लवकरच महाराष्ट्रातून परतणार आहे. मान्सून परतण्यापूर्वी सोमवारी आणि मंगळवारी राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील अनेक भागात यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार बुधवारी हवामान कोरडे राहिल आणि गुरुवारी हलका पाऊस पडेल.
हेही वाचा