Advertisement

छान किती दिसते...


छान किती दिसते...
SHARES

मुलुंड - झाडाचं एखादं सुकलेलं पान वाटतंय ना तुम्हाला? पण थांबा... हे झाडाचं पान नाही तर हे फुलपाखरू आहे. आश्चर्य वाटतंय ना? मुलुंडमधल्या खिंडीपाड्यात हे अनोखं फुलपाखरू आढळलंय. हे फुलपाखरू सुरुवातीला झाडाचं पानच वाटत होतं. फुलपाखरानं पंख मिटले होते त्यामुळे पंखांचा आकार पानासारखा वाटत होता. पण पंख उघडताच फिकट जांभळा, पांढरा आणि काळा असे तीन रंग दिसू लागले. केलिमा पॅरालेक्टा प्रजातीचं हे फुलपाखरू आहे. ही प्रजाती अत्यंत दुर्मीळ समजली जाते. या परिसराला लागूनच असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून हे फुलपाखरू आलं असावं, असा अंदाज आहे. भारतात फुलपाखरांच्या 1500 प्रजाती आढळतात. महाराष्ट्रात त्यापैकी 225 प्रजाती दिसू शकतात.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा