लाॅकडाऊनमुळे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात फ्लेमिंगो म्हणजे रोहित पक्ष्यांची संख्या 25 टक्के वाढल्याचं दिसून आलं आहे. लॉकडाऊनमुळे सर्व बंद आहे. माणसांचा वावर नसल्याने आणि प्रदूषणही नसल्यानं फ्लेमिंगोंसाठी हे वातावरण अनुकूल आहे. मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात दरवर्षी फ्लेमिंगोंचे आगमन होते. यावर्षी फ्लेमिंगोंचं आगमन उशीरानं झाले. पण मागील वर्षीच्या तुलनेत फ्लेमिंगोंची संख्या मोठी वाढली आहे.
याबाबत बॉम्बे नॅच्युरल हिस्ट्री सोसायटीनं दिलेल्या माहितीनुसार ,मुंबई आणि महानगर परिसरात यंदा २५ टक्के अधिक फ्लेमिंगो पाहायला मिळाले आहेत. शिवडी, ठाणे खाडी परिसर, एनआरआय कॉलनी, सीवूड्स, टीएस चाणक्य या नवी मुंबई परिसरातही फ्लेमिंगो मोठ्या संख्येनं पाहायला मिळत आहेत. या परिसरात अनेक बांधकामं सुरु आहे.त मात्र लॉकडाऊनमुळे परिसरात शांतता आहे. इथे दरवर्षी येणारे फ्लेमिंगो पाहता सीवूड्स परिसराला फ्लेमिंगो पक्षी अभयारण्य घोषीत करावं, असं बॉम्बे नॅच्युरल हिस्ट्री सोसायटीनं म्हटलं आहे.
लॉकडाऊनमुळे सगळीकडे शांतता आहे, यांना अन्नही सहज उपलब्ध होत आहे, जानेवारीत मुंबई महानगर क्षेत्रात रोहित पक्ष्यांची संख्या ही ३३ हजार ३३४ इतकी होती आता ही संख्या फेब्रुवारी महिन्यात १ लाखांवर पोहोचली आहे. जानेवारीत रोहित पक्ष्यांची संख्या कमी होती मात्र एप्रिलमध्ये ही संख्या वाढली आहे.
हेही वाचा -