Advertisement

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये अवकाळी पावसाची शक्यता

रविवारी 21 एप्रिल अवकाळी पाऊसाने हजेरी लावली होती.

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये अवकाळी पावसाची शक्यता
SHARES

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नागरिक हे उन्हाच्या तडाख्याने हैराण आहेत. ऐन उन्हाळ्यात राज्यातील सोलापूर, अक्कलकोट, पुणे, लातूर, महाबळेश्वर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागात रविवारी 21 एप्रिल अवकाळी पाऊसाने हजेरी लावली होती. या अवकाळी पाऊसामुळे नागरिकांसह बळीराजा हवालदिल झाला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतपीकाचे मोठे नुकसान झाले आहे.

तसेच राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे. त्याचबरोबरच मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना आणि हिंगोली या भागात देखील अवकाळी पाऊस पडण्याची शक्यात आहे.

राज्यातील पुणे, सोलापूर, सांगली, धुळे, जळगाव, लातूर, उस्मानाबाद आणि बीड या जिल्ह्यांना आज हवामान विभागाने पाऊसाचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे.

अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान

राज्यात शनिवारी अक्कलकोटमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे दोन गावात वाहतूक बंद करण्यात आली होती. तर तुळजाभवानी मंदिरात पाणी शिरले होते.

तसेच लातूरमध्ये गारांचा पाऊस पडल्यामुळे शेतीचे नुकसान झाले. तर, कणकवणली आणि सिंधुदुर्गमध्ये पावसामुळे आंबा आणि काजू पिकांवर परिणाम झाला आहे. या अवकाळी पाऊसामुळे राज्यातील काही भागात वीज पुरवठा देखील खंडीत झाला होता.हेही वाचा

देवनार डंपिंग ग्राऊंडमधील घनकचरा कमी होणार

मुसळधार पावसासह उष्णतेच्या लाटेचा इशारा


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा