मुंबईकरांसाठी आज एक खुशखबर आहे. मरीन ड्राइव्ह ते वांद्रे हा प्रवास आता अवघ्या 12 मिनिटांत पूर्ण होणार आहे. कारण कोस्टल रोडचं काम पूर्ण झालंय. त्यामुळे आता मरीन ड्राइव्हवरून थेट वांद्र्याला फक्त 12 मिनिटांत पोहोचता येणार आहे.
मरीन ड्राइव्ह ते वांद्रे अवघ्या 12 मिनिटांत
या मार्गापैकी मरीन ड्राइव्ह ते हाजी अलीपर्यंत मार्ग मुंबईकरांसाठी सुरू झालाय. त्याची लांबी 6.25 किमी (Mumbai Coastal Road) आहे. कोस्टल रोडचा पुढील टप्पा 4.5 किमी लांबीचा मार्ग वांद्रे-वरळी सीलिंकला जोडण्यात आलाय. यासाठी 136 मीटरच्या मोठ्या बो-स्ट्रिंग आर्च गर्डरचा देखील वापर करण्यात आलाय. सुमारे दोन हजार मेट्रिक टन वजनाचा हा गर्डर आहे. त्याची बांधणी रायगड जिल्ह्यामधील न्हावा या ठिकाणी करण्यात आलीय. या मार्गाचे काम आता पूर्ण झालंय. त्यामुळे शुक्रवारपासून प्रवाशांच्या सेवेमध्ये येणार आहे.
या मार्गामुळे वाहचालकांना मरीन ड्राइव्हवरून वांद्रयाला फक्त 12 मिनिटांत जाता येणार (Marine Drive to Bandra Distance) आहे.
कोस्टल रोड आणि सीलिंक जोडल्यामुळे वेळ आणि इंधनाची होणार बचत होणार आहे. तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्यास देखील मदत होणार आहे.
दक्षिण मुंबईहून वांद्रयापर्यंतचा प्रवास वेगवान होणार असल्याची देखील माहिती (Mumbai News) मिळतेय. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ 70 टक्के आणि इंधनाची बचत 34 टक्के होणार आहे.
हेही वाचा