Advertisement

सोने खरेदी तेजीत, गृह खरेदी मंदीत!

दसऱ्याच्या मुहूर्तापेक्षा दिवाळीतील पाडव्याच्या दिवशी सोने खरेदीला ग्राहकांनी पसंती दिल्याने आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी झाली. अनेक नामांकीत ज्वेलर्सनी विविध ऑफर्स देऊन ग्राहकांना आकर्षित केले होते.

सोने खरेदी तेजीत, गृह खरेदी मंदीत!
SHARES

दिवाळीतील बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी छोट्या प्रमाणावर का होईना, सोने खरेदी केली जाते.

या दिवशी सोनारांच्या दुकानात ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दिवाळीनंतर लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. त्यामुळे आजच्या दिवशी लग्नासाठी सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. दसऱ्याच्या मुहूर्तापेक्षा दिवाळीतील पाडव्याच्या दिवशी सोने खरेदीला ग्राहकांनी पसंती दिल्याने आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी झाली. अनेक नामांकीत ज्वेलर्सनी विविध ऑफर्स देऊन ग्राहकांना आकर्षित केले होते. कोणी घडणावळीवर सूट दिली, तर कोणी दोन लाखांच्या खरेदीवर घडणावळ मोफत दिली. त्यामुळे ग्राहकांनी यावर्षी पाडव्याला मनसोक्त सोने खरेदीचा आनंद लुटला.



दसऱ्याच्या दिवशीपेक्षा पाडव्याला ग्राहकांचा प्रतिसाद चांगला होता. यावर्षी छोट्या वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल होता. आणि त्याचबरोबर 50 हजारावरच्या खरेदीसाठी आधारकार्ड लिंक करण्याचे बंधन उठल्यामुळे ग्राहक खूषही होता. आता 2 लाखांच्यावर आधारकार्ड लिंक करायचे आहे. त्यामुळे ग्राहकांनी 2 लाखांच्या आत सोने खरेदी केली.

धवल कांबळे, लागू बंधू ज्वेलर्स


गृह खेरदी मंदावली

एकीकडे सोने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला असताना, दुसरीकडे मात्र गृह खरेदी यावेळीही मंदावलेली होती. ग्राहकांनी पाडव्याच्या दिवशीही गृह खरेदीकडे पाठ फिरवली आहे. घरांच्या वाढत जाणाऱ्या किंमती बघता, ग्राहकांनी गृहखरेदी करणे नापसंत केले होते. त्या मनाने मुंबईबाहेर उपनगरात गृह खरेदीला थोड्या प्रामाणात प्रतिसाद मिळाल्याचे बिल्डर असोसिएशनचे आनंद गुप्ता यांनी सांगितले.



हेही वाचा

यंदाच्या दिवाळीत ध्वनी प्रदूषणाला आवर, पण हवा प्रदूषण कायम!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा