Advertisement

GSB Ganpati: जीएसबी मंडळाची राज्य सरकारकडं 'ही' विनंती

जीएसबी सेवा मंडळानं याबाबत निवेदन काढलं आहे. जीएसबीचा महागणपती हा शाडूच्या मातीचा असतो.

GSB Ganpati: जीएसबी मंडळाची राज्य सरकारकडं 'ही' विनंती
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवावर मोठं संकट ओडावलं आहे. राज्य सरकारनं यंदाच्या गणेशोस्तवसाठी नियम व अटी घालून दिल्या असून, केवळ ४ फुटापर्यंतच मूर्तीची प्रतिष्ठापना करावी असं आवाहन केलं आहे. मात्र, असं असलं तरी मुंबईतील प्रसिद्ध लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना न करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांमध्ये संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच वडाळ्यातील सुप्रसिद्ध जीएसबी सेवा मंडळ गणेशोत्सव साजरा करणार आहे. परंतु, 'करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या सर्व सूचनांचं काटेकोर पालन करून साधेपणानं हा उत्सव साजरा केला जाईल. मात्र, जीएसबीच्या गणेशमूर्तीला चार फूट उंचीचे बंधन घालू नये,' अशी विनंती मंडळानं राज्य सरकारकडं केली आहे.

जीएसबी सेवा मंडळानं याबाबत निवेदन काढलं आहे. जीएसबीचा महागणपती हा शाडूच्या मातीचा असतो. पर्यावरणस्नेही (इको फ्रेंडली) अशी ही मूर्ती गेल्या ६५ वर्षांपासून मंडपातच साकारली जाते. मंडपातच कृत्रिम तलाव बनवून तिथंच तिचं विसर्जन केलं जातं. विसर्जन मिरवणूक काढली जात नाही. त्यामुळं जीएसबी महागणपतीच्या मूर्तीवर उंचीचं बंधन असू नये, असं मंडळाचं म्हणणं आहे. राज्य सरकार जीएसबी मंडळाची ही विनंती मान्य करते का, हे पाहावं लागणार आहे.

यंदा २२ ऑगस्ट ते २६ ऑगस्टपर्यंत उत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळानं घेतला आहे. सामाजिक अंतर, मुखवटे परिधान करणं, स्वच्छता व इतर निकषांचे पालन करून हा उत्सव साजरा केला जाणार आहे. भाविकांना मंडपाच्या आत प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांसाठी ऑनलाइन दर्शनाची सोय केली जाणार आहे. तर, सेवेदारांना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म द्वारे घरपोच प्रसाद वाटप करण्याचा निर्णय मंडळानं घेतला आहे.

वडाळ्यातील जीएसबी मंडळाचा गणेशोत्सव हा मुंबईतील एक प्रमुख उत्सव असतो. राज्यभरातून भाविक या उत्सवात सहभागी होत असतात. महागणपतींच्या आगमनामुळे कोविड-१९ च्या साथीचे संकट दूर होईल; कारण तोच सर्व अडथळ्यांचा नाश करणारा आहे,' असा विश्वासही मंडळानं व्यक्त केला आहे.



हेही वाचा -

Mumbai Rains: पुढच्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता- स्कायमेट

परीक्षा रद्द; तरीही मुंबई विद्यापीठाकडून शुल्क आकारणी



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा