घाटकोपर - होळीच्या दरम्यान समाजात शांतता आणि सलोखा टिकावा यासाठी उत्सव समितीची बैठक पोलिसांनी घेतली. घाटकोपर येथील चिरागनगर पोलीस ठाण्यात शनिवारी 10 वाजता ही बैठक घेण्यात आली. होळीमध्ये गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. डीजेच्या वापराने मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे डीजेचा वापर टाळावा. असं आवाहन या बैठकीतून कण्यात आलं.
या बैठकीत महिला मंडळांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. सण-उत्सव पारंपारिक आणि सांस्कृतिक पद्धतीने साजरा करा, परंतु त्यात धांगडधिंगा नसावा. प्रत्येक मंडळाने आपला उत्सव शांततेत कसा पार पडेल याची काळजी घ्यावी. तसेच गरज पडल्यास पोलिसांशी संपर्कात राहून पोलिसांची मदत घेण्याचे आवाहन उपायुक्त सचिन पाटील यांनी उपस्थित नागरिकांना केले. या बैठकीत पोलीस परिमंडळ 7 चे सहाय्यक पोलीस आयुक्त भीमदेव राठोड, पोलीस उपायुक्त सचिन पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील, नवनिर्वाचित नगरसेवक सुरेश पाटील, सूर्यकांत गवळी आणि बिंदू त्रिवेदी आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत प्रत्येक मंडळाचे प्रमुख सदस्य हजर होते.