शुक्रवारपासूनच संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. कुणी घरात तर कुणी सार्वजनिक ठिकाणी बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली. यात चित्रपटसृष्टी आणि क्रीडा क्षेत्रातील मंडळीदेखील मागे नाहीत. या कलाकारांच्या घरी देखील गणपतीचे आगमन झाले आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील त्याच्या घरी गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. ज्याची पोस्ट त्याने फेसबुकवर शेअर केली आहे. यामध्ये सचिन आणि त्याची पत्नी अंजली हे दोघेही मराठमोळ्या पारंपारिक वेशभूषेत दिसत आहेत. दोघेही हात जोडून गणेश वंदना करत आहेत.
श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा #GanpatiBappaMorya pic.twitter.com/y9rA0eWKa2
— sachin tendulkar (@sachin_rt) August 25, 2017
यासोबतच त्याने सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याचा व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. त्याच्या या पोस्टला 23 हजार लाईक्स मिळाल्या आहेत. चाहत्यांनी देखील सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत.
श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा #GanpatiBappaMorya pic.twitter.com/vrGvUCOwJ8
— sachin tendulkar (@sachin_rt) August 25, 2017
हेही वाचा -
'हा' आहे सचिनचा नवीन फिटनेस फंडा!
...यांचा घरगुती बाप्पा झाला 101 वर्षांचा