Advertisement

मंदिरात तोकडे कपडे न घालण्याचा साईबाबा संस्थानचं आवाहन

शिर्डी साई मंदिरात ‘तोकडे कपडे घालून येऊ नये. भक्तांनी भारतीय पेहरावात साईमंदिरात यावं,’ असं आवाहन करण्यात आलं आहे.

मंदिरात तोकडे कपडे न घालण्याचा साईबाबा संस्थानचं आवाहन
SHARES

शिर्डी साई मंदिरात ‘तोकडे कपडे घालून येऊ नये. भक्तांनी भारतीय पेहरावात साईमंदिरात यावं,’ असं आवाहन साईबाबा संस्थानकडून (Saibaba Sansthan) करण्यात आलं आहे.

अनलॉक अंतर्गत राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं सुरु झाली आहेत. यामध्ये शिर्डीतील साईबाबांचे मंदिरदेखील दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. जागृत देवस्थान असल्यामुळे हे मंदिर खुले झाल्यापासून साईभक्तांची येथे मोठी गर्दी होत आहे. मंदिर प्रशासनानं सर्व कोरोना प्रतिबंधक नियम पाळून दर्शनाची व्यवस्था केलेली आहे.

मंदिरात भारतीय पेहरावात यावं, अशा आशयाचे फलकदेखील साईबाबा मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. दर्शन घेण्यासाठी भक्तांनी भारतीय पेहरावात यावं, असं आवाहन साईबाबा संस्थानने केले आहे. भक्तगण दर्शनासाठी तोकडे कपडे घालून येत आहेत, अशी तक्रार यापूर्वी काही भक्तांनी साईबाबा संस्थानकडे केली होती. याच तक्रारीची दखल घेत, साईबाबा संस्थानने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, राज्य सरकारनं मंदिरं खुली करताना कोव्हिडचा संस‌र्ग होऊ नये यासाठी नियमावली आखून दिलेली आहे. परंतु, साईबाबा संस्थाननं केलेल्या‌ सगळ्या उपाययोजना फोल ठरल्याचं समोर आलं होतं. ऑनलाईन दर्शनात वेळोवेळी तांत्रिक बिघाड येत असल्यानं प्रत्यक्ष पद्धतीनं दर्शन घेण्यासाठी गर्दी होत असल्याचं समोर आलं होतं.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा