हॉलीवूड सिनेमा एव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर या चित्रपटाला भारतात तुफान प्रतिसाद मिळाला. थॅनॉससारखा खलनायक आणि मार्व्हल्सचे आजी-माजी सुपरहिरो एकत्र आणत तयार झालेल्या एव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकली. खास करून थॅनॉससारखा खलनायक तर प्रेक्षकांच्या जास्त पसंतीस उतरला. आतापर्यंत आलेल्या एव्हेंजर्स सिरीजमध्ये सर्व सुपरहिरोंची चर्चा असायची. पण यावेळी मात्र ढिप्पाड अशा थॅनॉसनं बाजी मारली. आता हेच बघा ना एव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉरमधल्या व्यक्तीरेखेशी प्रेरित होऊन वांद्रेमध्ये हाऊस ऑफ थॅनॉस नावाची इटरी सुरू करण्यात आली आहे.
'हाऊस ऑफ थॅनॉस' हे पूर्णपणे मार्व्हल्स थिमवर आधारीत आहे. हाऊस ऑफ थॅनॉसच्या प्रवेशद्वारातच तुमचं स्वागत करणारा थॅनॉसचा भला मोठा पुतळा दिसेल. याशिवाय आतील इंटिरीयर देखील तुमच्या चांगलं पसंतीस पडेल. इंटिरीयरसोबत तुम्हाला इथलं फुड देखील आवडेल. कॉनटिनेंटल यासोबतच सूप, पास्ता, पिझ्झा आणि बरंच काही तुम्ही इथं ट्राय करू शकता. तुम्ही जर डाएटवर असाल तर तुमच्यासाठी केटो मिल्स देखील इथं उपलब्ध आहेत.
१) एच.ओ.डी सिगनिटर पिझ्झा : तुम्हाला पिझ्झा खायला आवडत असेल तर इथला सिगनिचर पिझ्झा नक्की ट्राय करा. हा नॉनव्हेज पिझ्झा असून हटके पद्धतीनं सर्व्ह केला जातो. याशिवाय याची चव देखील हटके आहे.
२) स्पायसी चिकन क्रॅप्स : हा प्रकार तुम्ही नक्कीच ट्राय करा. क्रिस्पी कुरकुरीत चिकनचे पिस तुम्हाला नक्की आवडतील. एकदा खाल तर तुम्हाला पुन्हा खाण्याची इच्छा होईल. एका प्लेटमध्ये दोघांसाठी पुरेसं असं क्रिस्पी चिकन क्रॅप्स येतात.
३) स्निकर्स बार मिल्कशेकचा देखील आस्वाद तुम्ही घ्या. यासोबतच इथं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक तुम्ही ट्राय करू शकता.
तुम्ही जर एव्हेंजर्स सिरीजचे चाहते असाल तर तुम्ही नक्की हाऊस ऑफ थॅनॉसला भेट द्या. मला खात्री आहे की इथले फोटो तुम्ही इन्स्टावर अपलोड केल्याशिवाय राहूच शकणार नाही.
हेही वाचा -