कुकी अर्थात बिस्कीटं आपण सर्वच खातो. कुकीज वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आणि आकारात येतात. पण 'बियॉन्ड पॅनकेक्स'नं कुकीजना एका वेगळ्या स्थरावर नेलं आहे. 'बियॉन्ड पॅनकेक्स'नं कुकी शॉट्स हा नवीन प्रकार लाँच केला आहे.
बियॉन्ड पॅनकेक्स हे स्वादिष्ट असे पॅनकेक्स बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण यावेळी त्यांनी एक भन्नाट प्रकार सादर केला आहे तो म्हणजे कुकीज शॉट्स... ग्लासच्या आकारात कुकी असतं. या कुकीमध्ये हॉट चॉकलेट सर्व्ह केलं जातं.
कुकी शॉट्स चवीला अप्रतिम आहे. यामध्ये अंडं नसून ते चॉकलेट आणि मिल्कपासून बनवलं जातं. हॉट चॉकलेट पिऊन झालं की तुम्ही कुकीज खाऊ शकता.
कुठे : बियॉन्ड पॅनकेक्स, शॉप ३, ड्रिमलँड सिनेमा जवळ, त्रीभूवन मार्ग, रिलायन्स हॉस्पीटल समोर, ग्रँट रोड, गिरगाव
हेही वाचा