वडापाव आणि मुंबईकरांचं नातं तसं जुनंच. गरीबांचा बर्गर म्हणून वडापावकडे आजही बघितलं जातं. आत बटाट्याटी भाजी, वरून बेसनचा लेप असलेला वडा आणि एक पाव हे एवढं खाल्लं की पुढच्या कित्येक तासांची भूक मिटते. पण खवय्यांमध्ये फ्रचंड फेमस असलेला हाच वडापाव हातगाडीपासून थेट पंचतारांकित हॉटेलच्या चकचकीत टेबलांवर पोहोचला आहे!
अतिसामान्यांपासून ते उच्चभ्रूंच्या जिभेवर त्याची चव चांगलीच रेंगाळली. आज केवळ वडापावच्या विक्रीसाठी साखळी पद्धतीची दुकानं सुरू झाली. दोन-तीन रुपये दरापासून सुरू झालेला वडापावचा प्रवास पंधरा ते वीस रुपयांपर्यंत पोहोचला आहे. अस्सल मराठमोळी टेस्ट लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच जवळची वाटते. काहींनी स्वत:ची एक वेगळी चव जपत या वडापावमध्ये बदल केले.
व्हेज म्हणून ओळखला जाणारा हा वडापाव आता नॉनव्हेजमध्ये देखील उपलब्ध झाला आहे. 'पॅक अ पाव' या आऊटलेटमध्ये आता चिकन वडापाव देखील खाता येणार आहे. वांद्रे आणि कॅम्पस कॉर्नर इथल्या पॅक अ वडापावच्या दोन आऊटलेट्सला मुंबईकरांनी चांगलीच पसंती दिली आहे. त्यानंतर पॅक अ पावचं तिसरं आऊलेट आता वर्सोवामध्ये देखील ओपन करण्यात आलं आहे.
चिकन वडापावच नाही तर वडापाव या प्रकारात त्यांनी अनेक आमूलाग्र बदल केले आहेत. 'बटर चिकन पाव' आणि 'सुमित्रन स्मोकिन पाव' हे दोन भन्नाट प्रकार पण तुम्ही ट्राय करू शकता. सुमित्रन स्मोकिन पाव यामध्ये चिकन आणि स्मोक्ड कर्ड असं कॉम्बिनेशन असेल. फक्त चिकनच नाही, तर अनेक वेगवेगळ्या प्रकारांमध्ये तुम्ही वडापाव टेस्ट करू शकता. पनीर, चिकन, मटण, कबाब, मशरूम पाव असे अनेक प्रकार तुम्ही ट्राय करू शकता.
मीरा अपार्टमेंट, शॉप नंबर 3, वर्सोवा लिंक रोड, अंधेरी (प)
हेही वाचा
तुम्हाला माहिती आहे, मुंबईतला पहिला वडापाव कोणता?