Advertisement

एक कप चहा आणि त्याचे 75 फ्लेवर्स!

साधा चहा, मसाला चहा, ग्रीन टी, जिंजर टी चहाचे हे फ्लेवर्स तर सर्वांनाच माहीत असतील. पण केटलरीमध्ये जवळपास ७५ फ्लेवर्सचे चहा तुम्ही ट्राय करू शकता. इथे वेगवेगळ्या देशातील चहा तुम्हाला चाखता येणार आहेत. त्यांच्याकडे भन्नाट फ्लेवर्स आहेत. त्यांची नावं ऐकून तुम्ही देखील चक्रावून जाल.

एक कप चहा आणि त्याचे 75 फ्लेवर्स!
SHARES

गरम चाय की प्याली हो...उसको पीलानेवाली हो या नही हो...लेकीन गरम चाय की प्याली हो! सुख असो दु:ख असो वा टेन्शन असो वा आनंद...पण एक कप चहा सर्वांचीच कमजोरी...गाडीत पेट्रोल टाकलं की ती धावते. तसंच काहीसं आपलं आहे. जोपर्यंत गरमा गरम चहाचा एक घोट घेत नाही, तोपर्यंत समाधानच मिळत नाही. कारण खाद्य मैफलींची रंगत वाढते ती चहानेच!

जात, धर्म, प्रांत या भेदांपलिकडे जात या गरम गरम पेयानं प्रत्येकाच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. एखादं आलिशान रेस्टॉरंट असो वा हॉटेल असो, त्यांच्या मेन्यूकार्डमध्ये चहा असतोच. चहा म्हणजे केवळ साखर, चहा पावडर आणि दुधाचे उकळते मिश्रण नव्हे, त्यापलिकडेही चहाचे चविष्ट प्रकार आहेत. जुहूतल्या द केटलरी ( The kettlery) इथं तुम्हाला अशाच वेगवेगळ्या चहांचा आस्वाद घेता येईल!



चहाचे भन्नाट फ्लेवर्स!

साधा चहा, मसाला चहा, ग्रीन टी, जिंजर टी चहाचे हे फ्लेवर्स तर सर्वांनाच माहीत असतील. पण केटलरीमध्ये जवळपास ७५ फ्लेवर्सचे चहा तुम्ही ट्राय करू शकता. इथे वेगवेगळ्या देशातील चहा तुम्हाला चाखता येणार आहेत. त्यांच्याकडे भन्नाट फ्लेवर्स आहेत. त्यांची नावं ऐकून तुम्ही देखील चक्रावून जाल. चॉकलेट फ्लेवर मिक्स्ड टी, वेगवेगळे फ्रुट मिक्स्ड टी, आईस टी असे वेगवेगळे फ्लेवर्स इथं तुम्ही ट्राय करू शकता.


फूड-चहाचं कॉम्बिनेशन

इथे ग्रेस ऑफ मोनॅको टी सर्वात जास्त पसंत केला जातो. ग्रेस ऑफ मोनॅको हे ग्रीन आणि व्हाईट टी पासून बनवण्यात येते. त्यामध्ये व्हॅनिला आणि करडईचे मिश्रण असते. यासोबतच त्यात मिंट, लेमनग्रास हे फ्लेवर्सही अॅड केले जातात. याच्यासाठी तुम्हाला ३५० रुपये मोजावे लागतील.



ब्लॅक टी आणि हर्बल टीसाठी केटलरी प्रसिद्ध आहे. त्यांच्याकडे दार्जिलिंग टी, आसाम टी, निलगिरी टी अशा वेगवेगळ्या फ्लेवर्सचे चहा आहेत. इथला आणखीन एक भन्नाट प्रकार म्हणजे चाय पुचका. मूग आणि चाट मसाला टाकलेली पाणीपुरी आणि सोबतीला पेपरमिंट टीचा पॉट हे देखील इथं सर्व्ह केलं जातं. तर चहासोबत वेगवेगळे पदार्थ पेअर करून सर्व्ह केले जातात. उदाहरणार्थ ठेचा मायो!. ठेचा मायो हा पदार्थ चहासोबत पेअर करून दिला जातो. ठेचा मायो म्हणजे बाजरा केक हा कोल्हापुरी ठेच्यामध्ये डिब करून दिला जातो.



तुम्हाला सुद्धा असं काही तरी भन्नाट ट्राय करायचं असेल, तर नक्की केटलरीला भेट द्या. याशिवाय तुम्हाला यातले कुठले फ्लेवर्स गिफ्ट मिहणून द्यायचे असतील, तर तेही शक्य आहे. कारण वेगवेगळ्या फ्लेवर्सची चहापावडर त्यांनी विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही https://www.thekettlery.com/ त्यांच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. 

कुठे? - द केटलरी, हॉटेल हॉरिजॉन, दुसरा मजला, ३७ जुहू बीच, जुहू



हेही वाचा

फ्ली बाजार कॅफे...खाण्याचं एक भन्नाट ठिकाण!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा