पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी ( ८ ऑक्टोबर) २२५ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २०९ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर ९ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये खारघरमधील ४, पनवेलमधील २ तसेच खांदा कॉलनी, नवीन पनवेल आणि कामोठे येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १५, नवीन पनवेल १५, खांदा काॅलनी ८, कळंबोली १४, कामोठे १०२, खारघर ५९, तळोजा येथील १३ रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल १९, नवीन पनवेल ५०, कळंबोली ३०, कामोठे ४२, खारघर ६३, तळोजा येथील ५ रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २०९५१ कोरोना रूग्णांपैकी १८६८० रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ४८९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १७८२ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.
हेही वाचा -
प्रवाशांसाठी गुड न्यूज! ९ आॅक्टोबरपासून धावणार ‘या’ ५ विशेष एक्स्प्रेस
मुंबईकरांनो सांभाळून रहा! येत्या २-३ दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता