कल्याण – डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गुरूवारी ५८० नवीन रुग्ण सापडले आहेत. तर ६ जणांचा मृत्यू देखील झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे मागील २४ तासात ६०२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एकूण रुग्णांची संख्या आता १०,९३१ झाली आहे. यामध्ये ५२१९ रुग्ण उपचार घेत असून ५५४८ रूग्ण बरे झाले आहेत. आतापर्यत १६४ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सापडलेल्या ५८० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व १०३, कल्याण प. १७९, डोंबिवली पूर्व १८९, डोंबिवली प. ५९, मांडा टिटवाळा १०, मोहना ३७ तर पिसवली येथील ५ रुग्णांचा समावेश आहे.
मागील काही दिवसांपासून दिवसात कल्याण डोंबिवलीमध्ये रुग्ण वाढतच आहेत. बुधवारी आणि गुरूवारी रुग्णांच्या संख्येने ५०० चा आकडा ओलांडल्याने कल्याण डोंबिवलीकरांची चिंता वाढली आहे.
हेही वाचा -