Advertisement

५० हजार रूग्ण, १२ स्थानकं आणि वन रुपी क्लिनिकची वर्षपूर्ती!

रेल्वे प्रवाशांना दररोज जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. तसंच काहीजण अपघातात जखमीही होतात. त्यामुळे प्रवाशांना तात्काळ उपचार मिळावेत, या हेतूने वन रुपी क्लिनिक मुंबईच्या घाटकोपर, दादर, वडाळा, माटुंगा आणि कुर्ला या परिसरात सुरू करण्यात आलं.

५० हजार रूग्ण, १२ स्थानकं आणि वन रुपी क्लिनिकची वर्षपूर्ती!
SHARES

रेल्वे स्थानकांत रेल्वे प्रवाशांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे स्थानकात वन रुपी क्लिनिकची सेवा सुरू करण्यात आली. आजपर्यंत या क्लिनिकला बराच विरोध दर्शवण्यात आला आहे. असं असतानाही वन रुपी क्लिनिकने आपला एक वर्षाचा प्रवास पूर्ण केला आहे. १० मे २०१७ ला मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानकात वन रुपी क्लिनिकची सेवा पहिल्यांदा सुरू करण्यात आली होती.


का सुरू केलं वन रुपी क्लिनिक?

रेल्वे प्रवाशांना दररोज जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. तसंच काहीजण अपघातात जखमीही होतात. त्यामुळे प्रवाशांना तात्काळ उपचार मिळावेत, या हेतूने वन रुपी क्लिनिक मुंबईच्या घाटकोपर, दादर, वडाळा, माटुंगा आणि कुर्ला या परिसरात सुरू करण्यात आलं. आतापर्यंत वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून अनेक आपात्कालीन परिस्थितीत असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.


५൦ हजार रुग्णांवर उपचार

आतापर्यंत १२ स्थानकांत असलेल्या वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून ५൦ हजारांपेक्षा जास्त लोकांवर उपचार करण्यात आले आहेत. फक्त इथवरच न थांबता वन रुपी क्लिनिकने मुंबईकरांच्या घरा-घरात पोहोचण्यासाठी अगदी कमी खर्चात आरोग्य तपासण्या आणि औषधं उपलब्ध करुन दिली आहेत. शिवाय, अनेक उपक्रम, शिबिरं राबविली. दिसत नसलेला आजार म्हणजेच ब्लडप्रेशरसाठी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणीची शिबिर राबवली.


आतापर्यंत ४ यशस्वी प्रसूती

तात्काळ उपचारांसोबतच वन रुपी क्लिनिकने आतापर्यंत ४ महिलांची यशस्वी प्रसूती केली आहे. त्यामुळे वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे प्रत्येक रेल्वे स्थानकांत वन रुपी क्लिनिक असणं किती महत्त्वाचं आहे? हे सिद्ध झालं आहे.


आतापर्यंत वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून ५൦ हजारांहून अधिक रुग्णांना उपचार केले आहेत. तर, १५०० हून अधिक लोकांना गोल्डन अवरमध्ये उपचार मिळाले आहेत. त्यामुळे आम्ही आणखी चांगले उपचार देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

डॉ. राहुल घुले, संचालक, वन रुपी क्लिनिक


रेल्वे प्रवाशांना मेंबरशिप कार्ड

वन रुपी क्लिनिकने रेल्वे प्रवाशांच्या संपूर्ण कुटुंबियांना वैद्यकीय सेवेचा लाभ मिळावा म्हणून गोल्डन मेंबरशीप कार्डची सुविधाही सुरू केली. १ जानेवारीपासून ही सुविधा देण्यात आली. या मेंबरशिप कार्डमध्ये वर्षाला फक्त १०० रुपये भरावे लागणार आहेत.


८ महिन्यात रुग्णांचे २ कोटी वाचवले

रेल्वे अपघात, प्रसूती, हार्ट अॅटॅकचे रुग्ण, ब्लड प्रेशरचे रुग्ण अशा अनेक प्रकारच्या रुग्णांवर वन रुपी क्लिनिकने आतापर्यंत उपचार केले आहेत. शिवाय, ८ महिन्यांत रुग्णांचे २ कोटी १ लाख रुपये वन रुपी क्लिनिकने वाचवल्याचा दावा करण्यात आला आहे. आतापर्यंत तणावग्रस्त असलेल्या ५०० पेक्षा जास्त रुग्णांनी वन रुपीच्या मानसोपचारतज्ज्ञांकडे भेट दिली आहे.


वन रुपी क्लिनिक बंद करण्याचा निर्णय?

दरम्यान, रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरणारी ही सेवा बंद करण्याविषयी हालचाली सुरू झाल्या आहेत. राजकीय दबावामुळे वन रुपी क्लिनिक बंद करण्याचा निर्णय डॉ. राहुल घुले यांनी घेतला. तशा आशयाचं पत्र डॉ. घुले यांनी मध्य रेल्वेकडे दिलं. त्या पत्रात त्यांनी नमूदही केलं आहे. मात्र, यावर रेल्वे प्रशासनाकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचं दिसत आहे.



हेही वाचा

धावत्या ट्रेनमध्ये प्रसूतीकळा, वन रूपी क्लनिकमध्ये बाळाचा जन्म


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा