कोरोना विषाणू डोळ्यांद्वारे शरीरावर आक्रमण करू शकतो. अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या शास्त्रज्ञांच्या पथकानं शोधून काढलं आहे की, डोळ्याच्या एसीई -2 रिसेप्टर्सद्वारे हा विषाणू शरीरात प्रवेश करतो.
एसीई -2 रिसेप्टर्स शरीराच्या पेशींमध्ये संक्रमणासाठी 'गेटवे' मानले जातात. याद्वारे विषाणू शरीरावर आक्रमण करतो. एसीई -2 रिसेप्टर्स फुफ्फुस, श्वसनमार्गाच्या व्यतिरिक्त शरीराच्या इतर अवयवांमध्ये असतात.
शास्त्रज्ञांच्या मते, एखादा व्यक्ती खोकला किंवा शिंकला तर त्याच्या थुंकिचे थेंब बाहेर पडतात. खोकताना किंवा शिंकताना मास्क न लावल्यानं आमि रुमालाचा वापर न केल्यानं थुंकिवाटे विषाणू हवेत पसरतो. समजा त्याच वेळेस एखादा व्यक्ती तिथून गेला तर त्याच्या डोळ्याच्या पृष्ठभागावर विषाणू पोडोचतो आणि व्हायरस शरीरात प्रवेश करू शकतो.
असं मानलं जातं की, या कारणास्तव कोरोना विषाणूच्या बर्याच लक्षणांमध्ये नेत्रश्लेष्मला शोधाची लक्षणं देखील दिसून आली. यावेळी रुग्णांचे डोळे लाल झालेले आढळले.
अश्रूंच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रसार देखील होऊ शकतो, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. लिंग्ली झोऊ यांच्या नेतृत्वात जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधील शास्त्रज्ञांनी कोरोना डोळ्यांचा अभ्यास केला. वैज्ञानिकांनी एसीई -2 समजण्यासाठी १० मृत लोकांच्या डोळ्यांचा अभ्यास केला ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही.
डोळ्यांतून कोरोना विषाणूबद्दल अनेक वृत्तांत पसरल्यानंतर वैज्ञानिकांनी हा अभ्यास सुरू केला. यापूर्वी एका अभ्यासात असं आढळलं होतं की, कोरोना विषाणूच्या रुग्णांना कित्येक आठवड्यांपासून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा धोका असतो. तपासणी दरम्यान, विषाणूचा संसर्ग झाल्यावर २१ दिवसानंतर एका महिलेच्या डोळ्यात कोरोना विषाणी सापडला.