बृहन्मुंबई महानगरपालिकेने (brihanmumbai municipal corporation) जुलै 2023 च्या तुलनेत जुलै 2024 मध्ये डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रोएन्टेरिटिस, हिपॅटायटीस आणि चिकनगुनियाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय घट नोंदवली आहे.
मात्र, याच काळात मलेरिया (malaria) आणि स्वाइन फ्लू (H1N1) रुग्णांमध्ये किंचित वाढ झाली आहे. ही आकडेवारी महापालिकेच्या अहवालातून समोर आली आहे.
या अहवालानुसार, डेंग्यूची (dengue) प्रकरणे जून 2023 मधील 353 वरून जून 2024 मध्ये 93 पर्यंत घसरली आहेत. जुलै 2023 मध्ये 685 प्रकरणे होती. परंतु जुलै 2024 मध्ये ही संख्या 535 पर्यंत घसरली, जी 22% कमी आहे.
गॅस्ट्रोएन्टेरिटिसची (gastro) प्रकरणे देखील कमी झाली, जुलै 2023 मध्ये 1,767 वरून जुलै 2024 मध्ये 1,239 पर्यंत नोंदवली गेली आहे. तथापि, जून 2024 च्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे. जेव्हा फक्त 722 प्रकरणे नोंदवली गेली होती.
अहवालानुसार, लेप्टोस्पायरोसिस, हिपॅटायटीस आणि चिकनगुनियाच्या प्रकरणांची संख्या जुलै 2023 मध्ये 413, 144 आणि 27 वरून कमी होऊन जुलै 2024 मध्ये 141, 146 आणि 25 झाली आहे.
तथापि, मलेरियामध्ये घट झाल्याचे दिसून आले नाही. जुलै 2023 मध्ये 721 प्रकरणे समोर आली होती. या जुलैमध्ये 797 प्रकरणे समोर आली आहेत. तथापि, जून 2024 च्या 443 प्रकरणांच्या तुलनेत, मान्सूनच्या (monsoon) पावसामुळे हंगामी वाढ झाली आहे.
स्वाइन फ्लूची प्रकरणे जुलै 2023 मध्ये 106 वरून जुलै 2024 मध्ये 161 वर पोहोचली आहे यात 51.89% इतकी वाढ झाली आहे. तसेच जून 2024 मध्ये स्वाइन फ्लूचे फक्त 10 रुग्ण आढळले.
पावसामुळे (mumbai rains) पाणी साचून डासांची उत्पत्ती होते आणि रोगांची वाढ होते.
जानेवारी ते जुलै 2024 पर्यंतचा राज्यव्यापी डेटा रोग व्यवस्थापनातील प्रगती दर्शवितो. मलेरियाची प्रकरणे सहा मृत्यूंसह 7,447 पर्यंत कमी झाली आहेत. डेंग्यूची प्रकरणे 6,159 वरून 4,965 वर घसरली आहेत.
गेल्या महिन्यात महापालिकेने 'भाग मच्छर भाग' जनजागृती मोहीम सुरू केली होती. या उपक्रमात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित व्यक्तींनी व्हिडिओ संदेशांद्वारे डास नियंत्रणासाठी उपायांचा प्रचार केला. तसेच नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
हेही वाचा