Advertisement

आता पालिका सांडपाण्याचीही तपासणी करणार

मुंबईच्या बाहेरील भागातील सांडपाणी नमुने तपासणार आहे आणि कोरोनाव्हायरस प्रकारांच्या प्रसाराचा अभ्यास करण्यासाठी RT-PCR चाचण्या घेणार आहे.

आता पालिका सांडपाण्याचीही तपासणी करणार
(Representational Image)
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिके (BMC) नं RT-PCR चाचणीसाठी वेगवेगळ्या ठिकाणांचे सांडपाणी पाण्याचे १०० नमुने गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एखाद्या ठराविक परिसरातील COVID-19 कोरोनाची परिस्थिती समजण्यास मदत होते.

SARS-CoV-2 आणि इतर कोरोनाव्हायरसचे RNA [ribonucleic acid] मानवी मलमूत्रात कसे शोधले जाऊ शकतात यावर तपशीलवार माहिती याद्वारे देण्यात आली आहे.

पालिका मुंबईच्या बाहेरील भागातील सांडपाणी नमुने तपासणार आहे आणि कोरोनाव्हायरस प्रकारांच्या प्रसाराचा अभ्यास करण्यासाठी RT-PCR चाचण्या घेणार आहे.

येत्या आठवड्यात, पालिका मुंबईतील सांडपाणी नमुन्यांची चाचणी घेणार आहे. यासाठी कोरोनाव्हायरस प्रकारांच्या प्रसाराचा अभ्यास करण्यासाठी RT-PCR चाचण्या घेणार आहे. ज्यांची चाचणी COVID-19 साठी पॉझिटिव्ह आढळेल त्यांचे नमुने पालिका कस्तुरबा रुग्णालयात जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवेल.

BMC च्या अधिकार्‍यांनी सांगितलं की, सांडपाण्याचे नमुने तपासल्यानं त्यांना भविष्यातील धोरणे ठरवण्यास मदत होईल.

सुरेश काकाणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त, बीएमसी यांनी एका अहवालात नमूद केलं आहे की, पालिका आतापर्यंत समुदाय, रुग्णालये आणि नवीन विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचे जीनोम सिक्वेन्सिंग नमुने घेत होती.

ते पुढे म्हणाले की, प्राधिकरण आता सांडपाण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्याचा विचार करत आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टपासून, प्राधिकरणानं जीनोम सिक्वेन्सिंगसाठी एकूण १० सर्वेक्षणे हाती घेतली आहेत.

नुकत्याच जाहीर झालेल्या दहाव्या सर्वेक्षणात BMC च्या आरोग्य विभागानं गोळा केलेले २३७ नमुने हे हायली ट्रान्समिसिबल ओमिक्रॉन प्रकारासाठी पॉझिटिव्ह असल्याचे हायलाइट केले आहे.



हेही वाचा

बनावट पॅथॉलॉजी लॅबवरील नियंत्रणासाठी कायदा आणणार - राजेश टोपे

Maharashtra Budget 2022 : आरोग्य सेवांवर ११ हजार कोटी खर्च करणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा