Advertisement

माहुलमध्ये विलगीकरण केंद्र उभारण्यास हायकोर्टाची परवानगी, पण...

एम पश्चिम प्रभागाअंतर्गत येणाऱ्या माहुलमध्ये विलगीकरण केंद्र उभारण्यास परवानगी दिली आहे.

माहुलमध्ये विलगीकरण केंद्र उभारण्यास हायकोर्टाची परवानगी, पण...
SHARES

मुंबई हायकोर्टानं महानगरपालिकेला (BMC) एम पश्चिम (M West) प्रभागाअंतर्गत येणाऱ्या माहुलमध्ये (Mahul) विलगीकरण (Quarantine) केंद्र उभारण्यास परवानगी दिली आहे. या विलगीकरण केद्रात COVID 19 रुग्णांना ठेवता येऊ शकते. महानगरपालिकेला हायकोर्टाकडून (High Court) परवानगी मिळाली. परंतु, परिस्थिती आणखी बिकट झाल्यास हा फक्त शेवटचा पर्याय असेल. शिवाय न्यायालयाच्या परवानगीशिवाय क्वारंटाईन केंद्र भापरता येणार नाही, असं देखील कोर्टानं स्पष्ट केलं.

महानगरपालिकेचे प्रतिनिधीत्व करणारे वकील म्हणाले की येत्या काळात एम पश्चिम प्रभागातील COVID 19 रुग्णांची संख्या हजारोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, वकील म्हणाले की, पालिकेला किमान ३० हजार रूग्णांच्या संपर्कांसाठी विलगीकरण सुविधा तयार करावी लागेल.

सरन्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एस एस शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यावर प्रतिक्रिया दिली. मंगळवारी देण्यात आलेल्या आदेशात म्हटलं आहे की “भविष्यात परिस्थिती बिघडल्यास तिथल्या खाली सदनिकांना विलगीकरण केंद्र म्हणून वापरण्यास परवानगी देणं आवश्यक आहे. पण मर्यादित परवानगी देण्यात येत आहे.”

माहुल इथं मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहे. अशात कोरोना संशयितांसाठी माहुलमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला. या निर्णयाला विरोध करणारी जनहित याचिका सादर करत शारदा तेवर यांनी उच्च न्यायालयात आव्हान केलं. शारदा यांचा मुलगा आर्थर रोड कारागृहात आहे. त्याच्यावर खटला सुरू आहे. कारागृहातील कैदी आणि अंडरट्रायल्सना माहुल इथं विलगीकरण कक्षात ठेवण्याचे पालिका विचार करत आहे. त्यामुळे शारदा यांनी न्यायालयात धाव घेतली. तसंच घर बचाओ, घर बनाओ या एनजीओनेही या निर्णयाचा विरोध केला आहे.

याचिकादारांनी मांडलेल्या मुद्द्याविषयीही पालिकेनं प्रतिज्ञापत्रात युक्तिवाद मांडला. 'सध्याच्या परिस्थितीमुळे मागील तीन महिन्यांपासून या कंपन्यांमधील काम खूप कमी झाले आहे. मर्यादित मनुष्यबळाच्या आधारे काम सुरू आहे. पर्यायाने या परिसरातील हवेची गुणवत्ताही सुधारली असेल. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात या इमारतींमधील घरे विलगीकरणासाठी वापरता येऊ शकतात. शिवाय या केंद्रात ठेवण्यात येणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी वर्गही तैनात करण्यात येईल,' असे म्हणणे पालिकेने मांडले.



हेही वाचा

बोरीवली, दहिसर, कांदिवली आणि मालाडमध्ये COVID 19 च्या रुग्णांमध्ये वाढ

Coronavirus Pandemic: मुंबईत १५६७ नवे रुग्ण, दिवसभरात ९७ जणांचा मृत्यू

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा