Advertisement

Coronavirus update: राज्यात ५७२ कोरोनाबाधित रुग्ण बरे

राज्यभरात ५७२ कोरोनाबाधित रुग्ण (coronavirus patient) बरे झाले एकूण ३८६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Coronavirus update: राज्यात ५७२ कोरोनाबाधित रुग्ण बरे
SHARES

राज्यभरात ५७२ कोरोनाबाधित रुग्ण (coronavirus patient) बरे झाले एकूण ३८६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आरोग्य मंत्रालयानं (Health Department) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात (Maharashtra) २० एप्रिलपर्यंत  ४६६ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना (Coronavirus Lockdown 2.0) बाधित रुग्णांचा आकडा ४ हजार ६६६ वर गेला आहे. शिवाय सोमवारी कोरोनामुळे ९ मत्यूंची नोंद झाली असून मृतांचा आकडा २३२ वर गेला आहे.

८१ टक्के लक्षणविरहित

आजपर्यंत प्रयोगशाळेत (covid-19) पाठविण्यात आलेल्या ७६ हजार ०९२ नमुन्यांपैकी ७१ हजार ६११ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर ४६६६ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील २३३६ रुग्णांचे विश्लेषण केलं असता त्यापैकी १८९० (८१ टक्के) रुग्ण हे लक्षणविरहित आहेत तर ३९३ रुग्णांना (१७ टक्के) रुग्णांना लक्षणे होती. या रुग्णांपैकी ५३ रुग्ण (२ टक्के) हे अतिदक्षता विभागात भरती आहेत.

हेही वाचा - मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर झाल्या होम क्वारंटाईन

२३२ मृत्यूमुखी

सध्या राज्यात ९३ हजार ६५५ लोक होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) असून ६,८७९. लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सोमवारी राज्यात ९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील मुंबई येथील ७ आणि मालेगाव येथील २ रुग्णांचा समावेश आहे. या मृत्यूंपैकी ६ पुरुष तर ३ महिला आहेत. त्यामध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील ५ रुग्ण आहेत तर १ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे.  मालेगाव येथील मृत्युमुखी पडलेल्या २ रुग्णांना इतर काही आजार आहेत का याची माहिती अद्याप अप्राप्त आहे. उर्वरित ७ जणांपैकी ५ रुग्णांमध्ये (७१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २३२ झाली आहे.

२४ लाख लोकांचं सर्वेक्षण

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ३६८ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून सोमवारी एकूण ६३५९ सर्वेक्षण पथकांनी  काम केलं असून त्यांनी २३.९७ लाख  लोकसंख्येचं सर्वेक्षण केलं आहे.

हेही वाचा - अनेक आरोग्य कर्मचारीच कोरोनाच्या विळख्यात

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा