मुंबई - ‘रक्तदान हे श्रेष्ठ दान’ असा संदेश आपण अनेकदा ऐकतो. रक्तदान करणं हे किती महत्त्वाचं आहे हे आजवर विविध माध्यमातून अनेकदा पटवून दिलं गेलंय. मात्र त्यालाही हवा तसा प्रतिसाद आजही मिळत नसल्याचं अनेकदा समोर आलंय. त्यातच मार्च ते जून या कालावधीत याचे प्रमाण अधिक घटते. याची कारणे जरी अनेक असली तरी यामुळे थॅलेसिमिया सारख्या रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत आणि याचाच फटका बसतोय सध्या दर्शना उपाध्याय यांच्या मुलाला.
एकदा रक्तदान केल्याने एका युनिटमधून तीन जणांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे रक्तदानास योग्य असणाऱ्या व्यक्तीने तीन महिन्यातून एकदा रक्तदान केलं तरी चालेल असा सल्ला डॉक्टर्सनी दिलाय.
जर तुमच्या रक्ताने एखाद्याचा जीव वाचू शकत असेल तर तुम्हीही नक्की याचा विचार करून रक्तदान करा, म्हणजे येणाऱ्या दिवसांतही सुरळीत रक्त पुरवठा होऊन अनेक रुग्णांचे जीव वाचू शकतात.