वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अखत्यारीतील रुग्णालयांमध्ये चतुर्थ श्रेणी सेवांचं खासगीकरण करण्याबाबत स्वीकारलेल्या धोरणाच्या निषेधार्थ राज्यातील सर्व रुग्णालयांत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे. ११ ते १३ जूनदरम्यान हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. या कालावधीत मुंबईतील पाचही रुग्णालयांत काम बंद राहणार असल्याचं समजतं आहे.
या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव, वैद्यकीय शिक्षण संचालक, सर्व अधिष्ठाता यांना नोटीस पाठवून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. परंतु, त्यावर कोणतीच कार्यवाही न झाल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं आहे. मात्र, शासकीय रुग्णालयांतील या काम बंद आंदोलनाचा रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या सेवा खासगी कंत्राटदारांना देण्यासाठी शासनानं वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली आहे.
निविदा मागविल्या असून,
त्यानुसार कार्यवाही होत असल्यामुळं भवितव्य संपुष्टात आल्याची भीती कर्मचाऱ्यांना आहे.
त्यामुळं सध्याच्या कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याती शक्यता आहे.
हेही वाचा -
आषाढी एकादशीनिमित्त एसटीच्या जादा बस फेऱ्या