बोरीवली - बोरीवली पश्चिम हा भाग गोराई खाडीला लागून असल्यानं या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढलाय. तो रोखण्यासाठी स्थानिक नगरसेवक शिवा शेट्टी यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. 29 नोव्हेंबरला काँग्रेसच्या महिला नेता विजयालक्ष्मी यांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने गोराई आणि प्रभाकर वैती चाळीत डासांचा नायनाट करणाऱ्या औषधाची फवारणी केली. रहिवाशांना कोणतीही समस्या असेल तर जवळच्या काँग्रेसच्या कार्यालयात संपर्क करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय.