Advertisement

मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन


मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन
SHARES

शीव- कोळीवाडा परिसरातल्या कोकणी आगारमध्ये मोफत वैद्यकीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित शिबिरात 50 जणांनी तपासणी करून घेतली. शिबिरात हृदयरोग, कॅन्सर तपासणी तसंच डोळे तपासून चष्म्याचं मोफत वितरणही शिबिरात करण्यात आलं. एखादी सभा ठेवण्यापेक्षा जनतेला फायदा व्हावा, या दृष्टीनं आरोग्य शिबिराचं आयोजन केलं, असं आयोजक मुंबई तामिळ सेलचे अध्यक्ष एस. ए. सुंदर यांनी सांगितलं.
मुंबई काँग्रेस दक्षिण भारतीय सेल आणि सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या वतीनं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. माझी खासदार एकनाथ गायकवाड यांचीही या शिबिरास उपस्थिती होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा