Advertisement

बाधणाऱ्या उष्णतेपासून कसा कराल बचाव?


बाधणाऱ्या उष्णतेपासून कसा कराल बचाव?
SHARES

मुंबई - भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 2017 च्या उन्हाळ्यात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे. उष्णतेच्या लाटेमुळे कोणत्याही प्रकारची जिवीतहानी होऊ नये यासाठी याबाबतच्या उपाययोजना करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन प्रभागामार्फत देण्यात आलेले आहेत.

1) तहान लागली नसली तरीसुद्धा जास्तीत-जास्त पाणी प्या

2) हलके, पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरावे 

3) बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/ टोपी, बुट आणि चपलांचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा

4) शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमितपणे वापर करावा

5) ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा 

6) अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

7) दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे

8) उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा