महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्रात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत ७ टक्क्यांची घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने सादर केलेल्या आकडेवारीवारीतून ही बाब समोर आली आहे.
आकडेवारीनुसार, कर्नाटक आणि दिल्लीत आठवड्याला होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत अनुक्रमे ५० टक्के आणि ९.६ टक्के वाढ झाली आहे. तर महाराष्ट्रात मृत्यू दरात ११.५ टक्क्यांची घट झाली आहे. याशिवाय तामिळनाडूमध्ये १८.२ टक्के, आंध्र प्रदेशात ४.५, आंध्र प्रदेशातही र १३.७, कर्नाटकमध्ये १६, तामिळनाडूत २३.९ तर उत्तर प्रदेशात १७.१ टक्क्यांची घट झाल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे.
सध्या पाच राज्यांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात मिळून एकूण उपचार घेत असलेले ६२ टक्के रुग्ण आहेत. तसंच आंध्र प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात या राज्यांमध्येच एकूण मृत्यूंच्या ७० टक्के मृत्यू झाले आहेत.
मुंबईत १५२६ नवे रुग्ण, ३७ जणांचा दिवसभरात मृत्यू
राज्यात १८ हजार १०५ नवे रुग्ण, ३९१ जणांचा दिवसभरात मृत्यू