Advertisement

मुंबई महापालिकेचा नवा प्रयोग, आवाजावरुन कोरोना चाचणीला सुरुवात

कोरोना संशयित रुग्णाची कोविड चाचणी आता त्याच्या आवाजाद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी गोरेगावमधील नेस्को कोविड केंद्रात व्हॉईस बायोमार्कर्स हे यंत्र उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.

मुंबई महापालिकेचा नवा प्रयोग, आवाजावरुन कोरोना चाचणीला सुरुवात
SHARES

कोरोना संशयित रुग्णाची कोविड चाचणी आता त्याच्या आवाजाद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी गोरेगावमधील नेस्को कोविड केंद्रात व्हॉईस बायोमार्कर्स हे यंत्र उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. या यंत्रणेद्वरे संशयिताची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्याच्या आवाजावरुन कोरोना अहवाल काढला जाणार आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याचा प्रारंभ केला. पायलट तत्वावरील या उपक्रमाचा महापालिका अधिकाऱ्यांसह मान्यवरांच्या ऑनलाइन उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.

या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे कोरोनाविरोधातील लढा अधिक बळकट होणार आहे. तसंच शहरातील कोरोना संशयित रुग्णांचे त्वरित निदान होईल आणि त्यांना मदत मिळेल. असं अदित्य ठाकरे म्हणाले.

कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित या तंत्रज्ञानाच्या आधारे कोरोनाचे निदान लवकर करणे शक्य होणार आहे. पण निदानासाठीच्या आरटी-पीसीआर चाचण्या मात्र सुरुच राहतील, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. आरोग्य क्षेत्रात विविध अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जाईल, असं त्यांनी सांगितलं.



हेही वाचा -

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या २६ हजारांच्या वर

राज्यात आतापर्यंत पावणे पाच लाख रुग्ण झाले बरे




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा